समुद्रात ड्रग तस्कर जहाजावर अमेरिकेचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकन लष्कराने कॅरिबियन समुदात कथित ड्रग तस्करी करणाऱया एका जहाजावर हल्ला केला. या हल्ल्यात तीन तस्करांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. अमेरिकन लष्कराने एका जहाजाला लक्ष्य केले. या जहाजातून मादक पदार्थांची तस्करी केली जात होती, असा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे. या हल्ल्यात तीन तस्कर मारले गेले असून अमेरिकन लष्कराचा कोणताही जवान जखमी झाला नाही, असे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.