
वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोड प्रकल्पासाठी अंधेरीच्या सातबंगला परिसरातील नाना-नानी पार्कमधील तब्बल 184 झाडांची कत्तल केली जाणार असून 164 झाडे पुनर्रोपित केली जाणार आहेत. 2001 मध्ये तयार करण्यात आलेले हे उद्यान अंधेरी-वर्सोवा परिसरातील ज्येष्ठ नागरिक, मुले आणि रहिवाशांसाठी विरंगुळा म्हणून महत्त्वाचे ठरते. मात्र आता या ठिकाणची झाडे तोडण्यासाठी पालिकेने झाडांवर नोटीस लावल्या आहेत.































































