
भारती रिझर्व्ह बँक (आरबीआय) मध्ये असिस्टंट या पदांच्या एकूण 650 जागांसाठी भरती केली जात आहे. पदवी उत्तीर्ण असणाऱया उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून या पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. अर्ज भरण्याची अखेरची तारीख 8 मार्च 2026 पर्यंत आहे. भरतीसंबंधी सविस्तर माहिती बँकेची अधिकृत वेबसाईट rbi.org.in वर देण्यात आली आहे. अर्ज करणाऱया उमेदवाराचे वय किमान 20 ते कमाल 28 वर्षे असायला हवे.




























































