
या आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी शेअर बाजार वधारला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 650 अंकांनी वधारून 83,277 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 211 अंक वाढून 25,682 अंकांवर बंद झाला. आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3 लाख कोटींची वाढ झाली. ज्या कंपन्यांचे शेअर्स वाढले, त्यामध्ये कोल इंडिया, एचडीएफसी बँक, अदानी इंटरप्रायझेस, मॅक्स हेल्थकेअरच्या शेअर्सचा समावेश आहे.


























































