
वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत मनमानी कारभार करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करणाऱया बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. हजारो चालकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.
सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात 4 ते 15 फेब्रुवारीदरम्यान विशेष मोहीम राबवली होती. शहरातील प्रमुख जंक्शन, रेल्वे स्थानक परिसर व कॉरिडॉरवर ही मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त भाडे आकारणे, भाडे नाकारणे, अनधिकृत पार्पिंग, अवैध परवाने किंवा परवान्याशिवाय वाहन चालवणे, सिग्नल तोडणे व बेदरकारपणे गाडी चालविणे अशा चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून एकूण 36 हजार 153 ई चलन करण्यात आले.





























































