
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले पुण्यातील संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी हिला पुणे महापालिकेत नोकरी देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना याबाबत निर्देश दिले आहेत.
पहलगाम घटनेतील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र दहा महिन्यानंतरही आसावरी जगदाळे हिला नोकरी देण्यात आली नाही. खासदार सुप्रीया सुळे यांनी याबाबत ट्विट केले होते. या ट्विटनंतर सरकार हलले. आसावरी जगदाळे हिच्या शिक्षणाला समकक्ष पद निर्माण करून तिला सेवेत सामावून घ्यावे, असे निर्देश शिंदे यांनी आयुक्तांना दिले.





























































