प्रायोगिक रंगभूमीचा ध्यास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रंगभूमी म्हणजे केवळ करमणूक नाही; ती विचारांची प्रयोगशाळा आहे. व्यावसायिक नाटकांच्या झगमगाटापलीकडे एक वेगळीच दुनिया शांतपणे धगधगत असते, ती म्हणजे प्रायोगिक नाटकांची. येथे मोठय़ा सेट्सचा थाट नसतो, पण आशयाची ताकद अफाट असते. अल्प साधनसामग्री, नव्या पिढीचे लेखक-दिग्दर्शक, वेगळे विषय आणि धाडसी मांडणी यांच्या जोरावर ही नाटके प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात. समाजातील बदलते प्रश्न, मानवी नात्यांतील सूक्ष्म छटा आणि अस्वस्थ करणारे वास्तव यांचा थेट सामना या रंगमंचावर घडतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशी नाटके बघण्याची विनामूल्य संधी उपलब्ध आहे. रंगकर्मी आणि प्रेक्षक यांच्यातील थेट संवाद, अभिनय कार्यशाळा, चर्चासत्रे आणि नाटय़प्रक्रियेची झलक अनुभवण्याची ही सुवर्णसंधी आहे. व्रेसेंट थिएटर, मुंबई घेऊन येत आहे, नाटय़ महोत्सव शनिवार, 21 फेब्रुवारी आणि रविवार, 22 फेब्रुवारी रोजी पार्ले (पूर्व) येथील सावरकर सेवा केंद्र येथे आयोजित केलेला हा भव्य नाटय़महोत्सव आणि कार्यशाळा. भविष्यातील यशस्वी नाटय़कर्मींना आज त्यांच्या उमेदवारीच्या काळात भेटण्याची, त्यांचं काम बघण्याची आणि त्यांच्यासोबत काम करण्याची ही नामीसंधी आहे. हा कार्यक्रम संपूर्णपणे निःशुल्क आहे.

चला तर, नेहमीच्या चौकटीबाहेर पडूया. नव्या विचारांना, नव्या प्रयोगांना दाद देऊया. प्रायोगिक रंगभूमीचा हा अनुभव एकदा तरी जरूर घ्या. कारण इथे नाटक फक्त पाहायचं नसतं, ते मनापासून जगायचं असतं!