भाजप सरकार अल्पसंख्याकविरोधी, नसीम खान यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील भाजप महायुती सरकारने मुस्लीम समाजाला देण्यात आलेले 5 टक्के शैक्षणिक व नोकरीतील आरक्षण रद्द करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा व अल्पसंख्याक समाजावर अन्याय करणारा आहे. आरक्षण रद्द करून भाजप सरकारने अल्पसंख्याक समाजाला विकासाच्या प्रवाहात येण्यापासून रोखण्याचे पाप केल्याचे काँग्रेस नेते नसीम खान यांनी म्हटले आहे.

नसीम खान म्हणाले, 2014 साली काँग्रेस सरकारने मुस्लीम समाजातील मागास घटकांना 5 टक्के शैक्षणिक व नोकरीत आरक्षण देण्याचा अध्यादेश काढला होता, त्यानंतर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने त्या अध्यदेशावर पुढील निर्णय घेतला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने मुस्लीम समाजातील मागास घटकांना 5 टक्के शैक्षणिक आरक्षण देण्याचा अंतरिम आदेश दिला होता. 2014-15 या शैक्षणिक वर्षात हे आरक्षण सुरू झाले होते. पुढे न्यायालयाच्या या आदेशाची अंमलबजावणी भाजप सरकारने केली नाही.