
मुंबईजवळ अरबी सुमद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे भव्यदिव्य स्मारक उभारण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबर 2016 रोजी या स्मारकासाठी जलपूजनही झाले मात्र, दहा वर्षे होऊनही स्मारकाच्या उभारणीला अद्याप मुहुर्त सापडलेला नाही. त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
”परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना गेट वे ऑफ इंडिया, अरबी समुद्र दाखवायला आले होते. तेव्हा समुद्र पाहून पंतप्रधानांना त्यांनी शिवस्मारकासाठी केलेल्या जलपूजनाचे स्मरण व्हायला हवे होते. पण त्यांना आता ते स्मरण होणार नाही कारण आता निवडणूका नाहीत. किमान फडणवीसांना स्मरण असायला हवं होतं.

























































