
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये मोठी घोषणा केली आहे. गुगल कंपनी पुढील पाच वर्षांत म्हणजेच 2026 पासून 2030 पर्यंत हिंदुस्थानात 1 लाख 36 हजार 650 कोटी रुपये (15 अब्ज डॉलर) ची गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे. विशाखापट्टणममध्ये 15 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या टप्प्यांसाठी एक पूर्ण स्टॅक एआय हबची स्थापना केली आहे, असे सुंदर पिचाई यांनी सांगितले.


























































