शिवरायांच्या जयघोषाने आग्रा किल्ला दुमदुमला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुघलशाहीला ललकारणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला उत्तर प्रदेशातील आग्रा किल्ला आज शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला. किल्ल्यातील जहांगीर महालात सलग चौथ्या वर्षी गुरुवारी शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. हजारो शिवप्रेमींनी यावेळी गर्दी केली होती.

महाराष्ट्र सरकारच्या सांस्पृतिक विभागाच्या सहकार्याने झालेल्या या सोहळय़ाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्पृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार, अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील उपस्थित होते. यावेळी निऑन शोचे आयोजन करण्यात आले होते.

शिवस्मारक उभारणार
‘छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने जिथे पैद केले होते त्या जागेवर उत्तम स्मारक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या जागेचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे हे काम लवकरच पूर्ण होईल,’ असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.