मुंबई विमानतळावर ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष, भारतीय कामगार सेनेच्यावतीने शिवजयंती उत्साहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय कामगार सेना व मुंबई विमानतळ प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे उत्साहात साजरी करण्यात आली. मुंबई विमानतळ विभागात कार्यरत असलेल्या विविध कंपन्यांतील व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषणाने विमानतळ परिसर दुमदुमला.

भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजित साळवी, संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, उपविभागप्रमुख समीर साबे, नगरसेविका सोनाली साबे यांच्यासह मुंबई विमानतळ विभागात कार्यरत असलेल्या विविध कंपन्यांतील व्यवस्थापनाच्या प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय शंकर कदम यांनी केले.

भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संतोष कदम, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, पोपट बेदरकर, गोविंद राणे, सहचिटणीस नीलेश ठाणगे, जगदीश निकम, विजय शिर्के, मिलिंद तावडे, विजय तावडे, दिनेश परब, सुजित कारेकर, वसंत गुरव उपस्थित होते.