मंत्रालयातील प्रकाराने माझ्या प्रतिमेला डाग, झिरवाळ यांची खंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंत्रालयातील लाचखोरीच्या प्रकारामुळे माझ्या प्रतिमेला डाग लागला आहे, अशा घटना घडल्या की मानसिक त्रास होतो, अशी खंत अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज व्यक्त केली.

नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात लाच मागण्यासाठी त्यांचे खासगी सचिव डॉ. रामदास गाडे आणि लिपिक राजेंद्र ढेरंगे यांनी कोड ठेवले होते. एका स्टिंग ऑपरेशनमधून ते कोड समोर आले होते. त्याबाबत बोलताना झिरवाळ म्हणाले की, ‘कुणी शत्रू म्हणून हे स्टिंग ऑपरेशन केले नाही. त्यांना कामात काहीतरी त्रास झाला असावा म्हणून त्यांनी सत्य बाहेर आणले. आता चौकशी सुरू असून सत्य लवकरच बाहेर येईल.’