झिम्बाब्वेची धूळधाण उडवत चेन्नई जिंकली, उपांत्य फेरी एक पाऊल दूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘करो या मरो’चे संकट समोर उभे ठाकताच हिंदुस्थानी संघ अंगार बनला. उपांत्य फेरीचे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी हिंदुस्थानच्या एक नव्हे तर आघाडीच्या सर्वच धुरंधरांनी आपल्या बॅटची कमाल दाखवत झिम्बाब्वेविरुद्ध 256 धावांचा अक्षरशः एव्हरेस्ट उभारला आणि तो पाहूनच प्रतिस्पर्ध्यांची मान झुकली. धावांचा हा महापर्वत चढण्याऐवजी झिम्बाब्वेने केवळ 20 षटके फलंदाजी करण्यातच धन्यता मानली. आजच्या विजयामुळे रविवारी विंडीजविरुद्ध होणाऱ्या लढतीला उपांत्यपूर्व फेरीचे रंग लागले आहेत. जो जिंकेल तोच उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळेल.