
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्यासाठी विधान परिषदेत ठराव आणावा आणि तो मंजूर करावा, अशी मागणी आज आमदार प्रसाद लाड यांनी केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा ठराव विधानसभेत यापूर्वीच करण्यात आला आहे. यानुसार विधान परिषदेत आमदार प्रसाद लाड यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज पुण्यतिथी असल्याचे सरकारला आठवण करून दिली. सरकारने सभागृहात त्यांना अभिवादन केले पाहिजे, असे सांगत सरकारने सावरकर यांना देशाचा सर्वोच्च असा मरणोत्तर भारतरत्न देऊन सन्मान करावा, अशी मागणी केली. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यासंदर्भातील ठराव करावा आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तो केंद्र सरकारला पाठवावा, अशी त्यांना विनंती केली.



























































