अनिल अंबानी यांच्या घरावर सीबीआयचा छापा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ईडीने उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुंबईतील घरावर जप्ती आणली असताना सीबीआयनेही अनिल अंबानी आणि त्यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्सविरोधात फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल केला असून त्यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टापून कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत.

बँक ऑफ बडोदाकडून घेण्यात आलेल्या कर्ज प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. बँक ऑफ बडोदाची 2 हजार 220 कोटींची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून त्याआधारे गुन्हा दाखल करून सीबीआने कारवाईचे पाऊल उचलले. रिलायन्स कम्युनिकेशन्सचे कार्यालय आणि अनिल अंबानी यांच्या घरावर छापा टापून सीबीआयने कर्ज व्यवहारांशी संबंधित महत्त्वाचे दस्तावेज जप्त केले.

अन्य प्रकरणात अनिल अंबानी आज ईडीसमोर हजर झाले. त्यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे 9 तास चौकशी केली.