महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी नावे समोर येणार- मनोज जरांगे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परळी येथील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात परळी पूर्ण हादरून जाईल, अशी  मोठी नावे समोर येणार आहेत, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी  आंतरवाली सराटी येथे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणातील वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्या असून त्यांचे अहवाल आता एसआयटीकडे सुपूर्द करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ही कायदेशीर प्रक्रिया असून नाका&s टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगचा अहवाल आल्यानंतर तो कोर्टापुढे सादर केला जाईल. दरम्यान, या प्रकरणात भविष्यात समोर येणाऱया मोठय़ा नावांमुळे परळी हादरून जाईल, असेही मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. एकदा तो अहवाल  तपास अधिकारी पुमावत यांच्या हातात पडला की तुम्ही कल्पनाही करणार नाही अशी नावे बाहेर येणार आहेत. मला माहीत असून सुद्धा काही गोष्टी मी बोलणार नाही. कारण अघटितच घडणार नाही म्हणून महादेव मुंडेंच्या बाबतीत तपास लावून नाका&s टेस्टपर्यंत आणला, एसआयटीपर्यंत आणला, मुख्यमंत्र्यांनी त्यात स्वतŠ लक्ष घातल्याने तपास एसआयटीमार्फत पुढे नेण्यात येत आहे. इथपर्यंत तो विषय आणून ठेवलाय. पण तपास यंत्रणेला काही अडचण येऊ नये म्हणून आपण प्रत्येक गोष्ट बोलून दाखवावीच असं काही नसतं.