डॉ. योगेश म्हसे अल्पसंख्याक विभागाचे सचिव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दिवशी शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देणारी प्रमाणपत्रे जारी केल्याबद्दल वादाच्या भोवऱयात सापडलेल्या अल्पसंख्याक विभागाच्या सचिवपदी योगेश म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने आज दोन सनदी अधिकाऱयांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची बदली महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.