युद्धामुळे खाद्यतेलासह सुका मेवा, खजूर, डाळी महागल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखाती युद्ध सुरू आहे. आखाती युद्धाचा परिणाम आपल्या किचनवर दिसायला सुरुवात झाली आहे. देशभरातील बाजारामध्ये खाद्यतेलापासून तर खजूर, बदाम, पिस्ता, अंजीर महाग होऊ लागले आहे.

हिंदुस्थान इराणमधून खाद्यतेल आणत नाही; मात्र हिंदुस्थान आपल्या गरजेचे 60 टक्के खाद्यतेल अन्य देशांतून आणतो. म्हणजे इंडोनेशिया, मलेशियातून पामतेल, अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून सोयाबीन तेल, रशिया-युव्रेनमधून सूर्यफुलाचे तेल आणतो. युद्धामुळे क्रूड ऑईल महागले आहे. त्यामुळे बायोफ्युएल तयार करण्यासाठी पाम आणि सोया तेलाचा वापर जास्त केला जातोय. त्यामुळे खाद्यतेलाच्या पुरवठय़ात घट झाली आहे. परिणामी त्यांच्या किमती वाढत आहेत.

इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोडय़ुसर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि इमामी एग्रोटेकचे सीईओ सुधाकर देसाई यांनी सांगितले की, अमेरिका आणि इराणमध्ये कोणत्याही प्रकारच्या तणावाचा परिणाम हिंदुस्थानातील क्रूड ऑइल आणि कुकिंग ऑइलच्या बाजारावर थेट परिणाम होईल. क्रूड ऑइलच्या किंमतवाढीमुळे पेट्रोल-डिझेल आणि फॉसिल फ्यूल महाग होते. यामुळे प्रत्येक गोष्टीचा लॉजिस्टिक्स खर्च वाढतो आणि त्यामुळे जहाजांसाठी विमा जोखीमदेखील वाढू शकते.

इराण आणि अफगाणिस्तानातून येणारे पिस्ता, केसर, अंजीर या सुका मेव्याचा पुरवठा ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सुका मेव्याच्या किमती वाढत आहेत.

तूर, उडीद, मसूर डाळीची आयात म्यानमार, पॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांतून करतो. होर्मूज सामुद्रधुनीच्या नाकाबंदीमुळे पश्चिम आशियात अडकलेल्या जहाजांना, कंटेनर्सना लांबचा रस्ता कापावा लागता आहे. त्यामुळे या वस्तूंना हिंदुस्थानात आणण्याचा खर्च वाढला आहे. अशातच कांद्याच्या किमतीतही वाढ दिसून येत आहे.