
दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेवर पंजाब आणि हरियाणातील घडामोडींचा जसा परिणाम होतो तसाच मुंबईच्या प्रदूषणात शेजारील शहरांचा काही परिणाम होतो का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने आज उपस्थित केला. तसेच याबाबत न्यायालयाने तज्ञांकडून सूचनाही मागवल्या.
मुंबईच्या खराब हवामानाची दखल घेत हायकोर्टाने याप्रकरणी 2023 साली ‘स्युमोटो’ याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर आज गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीवेळी वनशक्ती या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ काwन्सिल जनक द्वाराकादास यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, पनवेल महानगरपालिका हद्दीत असलेल्या पंटेनर डेपोमधून सतत होणाऱया ट्रक वाहतुकीमुळे गंभीर वायू प्रदूषण होत आहे. न्यायमूर्तींनी याची दखल घेत खंडपीठाने यापूर्वीच निवृत्त मुख्य न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि निवृत्त न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांची समिती स्थापन केली आहे. प्रदूषणाबाबतच्या सूचना या समितीला सादर करण्याचे निर्देश दिले असून न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी एप्रिलपर्यंत तहकूब केली आहे.
नवी मुंबईत बांधकामामुळे प्रदूषण
नवी मुंबईत विमानतळाचे काम व मोठय़ा प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकामामुळे प्रदूषण वाढत असून तिथे योग्य उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. न्यायालयाने संबंधित पक्षकारांना या समितीच्या प्राथमिक अहवालाचा अभ्यास करण्याचे आणि समितीला सहकार्य करण्याचे आदेश दिले.




























































