
आसाममध्ये हवाई दलाचे सुखोई जेट कोसळून झालेल्या दुर्घटनेत 2 वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. सुखोई एसयू-३०एमकेआय लढाऊ विमान गुरुवारी संध्याकाळी जोरहाट येथून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच बेपत्ता झाले आणि गुरुवारी संध्याकाळी रडारशी संपर्क तुटला. भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी जोरहाट येथून उड्डाण केल्यानंतर रडारशी संपर्क तुटल्याने सुखोई एसयू-३०एमकेआय लढाऊ विमानाचा अपघात झाला. या दुर्घटनेच दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरागकर अशी वैमानिकांची नावे आहेत.
सुखोई लढाऊ विमान जोरहाट एअरबेसपासून सुमारे ६० किमी अंतरावर असलेल्या कार्बी आंगलोंगच्या डोंगराळ भागात कोसळले. प्रशिक्षण मोहिमेवर असलेले एसयू-३०एमकेआय जोरहाटपासून सुमारे ६० किमी अंतरावर असलेल्या कार्बी आंगलोंगच्या परिसरात कोसळले. शोध मोहीम सुरू आहे, असे आयएएफने सुरुवातीच्या निवेदनात म्हटले आहे. गुरुवारी सुखोईने जोरहार येथून उड्डाण केल्यानंतर, विमानाचा जमिनीवरील नियंत्रणाशी शेवटचा संपर्क संध्याकाळी ७.४२ वाजता झाला होता. त्यानंतर या विमानाशी संपर्क होऊ शकला नाही.
२००० च्या दशकाच्या सुरुवातीला हवाई दलात समाविष्ट केलेले सुखोई एसयू-३० एमकेआय हे सर्वात सक्षम आघाडीच्या लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते. सुखोई-30 फायटर जेट यापूर्वीही कोसळले आहे. हवाई दलाकडे सध्या २०० हून अधिक सुखोई जेट्सचा ताफा आहे.

























































