
प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान तिच्या एका कार्यक्रमादरम्यान अचानक भावनिक झाली आणि गाताना रडू लागली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती प्रेक्षकांची माफी मागताना दिसत आहे, तर तिथे उपस्थित असलेले लोक तिला प्रोत्साहन देताना दिसत आहेत. सुनिधी चौहान सध्या तिच्या ‘आय एम होम’ कॉन्सर्ट टूरवर आहे. याचाच एक भाग म्हणून, ती हिंदुस्थानातील विविध शहरांमध्ये तिच्या चाहत्यांसाठी गाण्याचे कार्यक्रम करत आहे. परंतु लखनौमधील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान, सुनिधी “तेरी यादों में” गाणे गात असताना अचानक थांबली आणि रडू लागली. त्यामुळे प्रेक्षकांनाही प्रश्न पडला ती नेमकी का रडत आहे..
LIVE शो में रो पड़ीं सुनिधि चौहान @SunidhiChauhan5 #thehohalla #SunidhiChauhan #LucknowConcert #IAmHomeTour #SunidhiLive #BhojpuriFever #LucknowNightlife #SunidhiChauhanLive #BollywoodInLucknow #MusicConcert2026 pic.twitter.com/QDVncoCP9o
— thehohalla (@thehohalla) March 8, 2026
यावर सुनिधीने म्हटले, “आज माझा घसा खूप दुखतोय, मला माहीत आहे या कठीण प्रसंगात तुम्ही सर्व माझ्यासोबत आहात.. पण मी तरीही गाणार आहे. यानंतर प्रेक्षकांना सुनिधी म्हणाली, माझ्यासोबत असे कधीही घडले नाही. हा क्षण खूप लाजिरवाणा आहे. मी नेहमीच माझ्या गायनात माझे १००% देण्याचा प्रयत्न करते. परंतु दुर्दैवाने आज माझा घसा दुखत आहे. मी चांगले गाण्याचा प्रयत्न करेन. जर तसे झाले नाही तर मी माफी मागते. तुमच्या प्रेमाबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते.”
सुनिधी भावूक झालेली पाहून, तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या आणि तिला प्रोत्साहन दिले. प्रेक्षकांनी सुनिधीला प्रोत्साहन देऊन गाण्यास सांगितले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, चाहत्यांनी सुनिधीला म्हटले, “तू तुझे २०० टक्के देत आहेस. आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे.” असे म्हणत चाहत्यांनी सोशल मीडियावर तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून जोरदार कमेंट्स येऊ लागल्या आहेत.
सुनिधी तिच्या कॉन्सर्टसाठी अनेकदा चर्चेत असते. ती वेळोवेळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तिच्या चाहत्यांसाठी कॉन्सर्ट आयोजित करते. सुनिधी सध्या “आय अॅम होम” कॉन्सर्ट टूरवर आहे. तिने २४ डिसेंबरला मुंबईतून या टूरला सुरुवात केली आहे.


























































