कपात सूचनांची उत्तरे रखडली – अजय चौधरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ajay chaudhary shiv sena

अर्थसंकल्प आणि पुरवणी मागण्यांसंदर्भात आम्ही सदस्य म्हणून कपात सूचना ऑनलाईन सादर करतो. त्या स्वीकृत झाल्या की त्याची यादी सभागृहाच्या पटलावर येते. कपात सूचनांवर चर्चा होत नाही, पण त्या सूचनांची लेखी उत्तरे द्यायला पाहिजेत तीसुद्धा मिळत नाहीत. गेल्या दोन-तीन अधिवेशनांमध्ये मांडलेल्या कपात सूचनांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. कपात सूचनांची उत्तरे देण्याबाबत अध्यक्षांनी सूचना द्याव्यात, असा मुद्दा शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. त्यावर तशा सूचना दिल्या जातील, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.