Maharashtra Budget 2026 – महाराष्ट्रात सर्वाधिक फार्मर आयडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कृषी क्षेत्रातील विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचविण्यासाठी केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागामार्फत अ‍ॅग्रीस्टॅक योजना राबविली जाते. याअंतर्गत महाराष्ट्रात 4 मार्च 2026 पर्यंत एक कोटी 31 लाख 82 हजार शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) देण्यात आले आहेत. बोगस आयडी देण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास चौकशी करून सामूहिक सुविधा केंद्रावर कारवाई केली जाईल, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत सांगितले. विजय वडेट्टीवार, नमिता मुंदडा यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.