
पश्चिम रेल्वेवरील प्रभादेवी स्थानकाजवळील प्रभादेवी उड्डाणपुलाच्या तुळया उभारण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. बोरिवली–भाईंदरदरम्यान शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेऊन पायाभूत कामे करण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत चर्चगेट–प्रभादेवीस्थानकांदरम्यान आणि माटुंगा रोड–माहीम स्थानकांदरम्यान कोणतीही लोकल धावणार नाही. बोरिवली–भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी मध्यरात्री 12.15 ते 3.45 दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर प्रभादेवी येथे सर्व मार्गिकांवर शनिवारी मध्यरात्री 1.30 ते रविवारी सकाळी 6 दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.ब्लॉकदरम्यान प्रभादेवी स्थानकावर काही लोकल रद्द करण्यात येतील आणि काही दादर आणि वांद्रे येथे अंशतः रद्द केल्या जातील.





























































