‘एक्स’वर डिजिटल पेमेंटही होणार,  एलॉन मस्क घेऊन येताहेत ग्लोबल सुपर ऍप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क हे संपूर्ण जगासाठी  ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ‘ग्लोबल सुपर ऍप’   बनवण्याच्या तयारीत आहेत. ‘एक्स’वर येत्या काळात  मेसेजिंग, सोशल मीडिया, शॉपिंग, पेमेंट आणि व्हिडीओ कॉलिंग आदी सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी मस्क प्रयत्नशील आहेत. यासाठी ‘एक्स मनी’ची मोठी तयारी सुरू असून, पुढील महिन्यापासून याचे बीटा व्हर्जन लॉन्च केले जाणार आहे. याद्वारे युजर्सना मनी ट्रान्सफरची सुविधा मिळेल.

 2022 मध्ये एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतला. त्यानंतर टिवटर हे ‘एक्स’ म्हणून ओळखले जात आहे. आगामी काळात ‘एक्स’वर डिजिटल पेमेंट आणि वॉलेटची सुविधाही उपलब्ध होईल. यासाठी ‘व्हिसा’सारख्या कंपन्यांशी भागीदारी करण्यात आली आहे. याशिवाय, स्टॉक ट्रेडिंग आणि गुंतवणुकीच्या सेवा तसेच शॉपिंग सुविधेचाही यात समावेश असेल.

एलॉन मस्क यांना केवळ एका देशापुरते मर्यादित न राहता जगासाठी स्पेशल ऍप तयार करायचे आहे.  मात्र, यासाठी विविध देशांचे वित्त नियम, डेटा प्रायव्हसी कायदे आणि वेगवेगळ्या एजन्सींच्या परवानग्या मिळवणे हे मोठे आव्हान असणार आहे. युजर्सने प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त वेळ घालवावा आणि नवीन महसूल मॉडेल उभे करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.