46 टक्के हिंदुस्थानींची झोप अपुरी  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

जलद जीवनशैली, रात्री उशिरापर्यंत मोबाईल-लॅपटॉपची स्क्रीन पाहणे आणि वाढत्या मानसिक तणावामुळे अनेक जणांना पुरेशी झोप मिळत नाही. ऑनलाइन सर्वेक्षण प्लॅटफॉर्म लोकल सर्कल्सच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, 46 टक्के हिंदुस्थानींनी सांगितले की, गेल्या 12 महिन्यांत त्यांना दररोज 6 तासांपेक्षा कमी अखंड झोप मिळाली. झोप ही आजच्या काळातील एक मोठी, पण सर्वात दुर्लक्षित आरोग्य गरज बनली आहे. लवकर झोपणे-लवकर उठण्याचा ट्रेंड आता बदलत आहे.