
मानाची पालखी, पहिली पालखी अशी ओळख असलेल्या दादर गोखले सोसायटी लेन येथील साई सेवक मंडळातर्फे पालखीसह पदयात्रेचे आयोजन केले आहे. ही पदयात्रा उद्या, सोमवारी साई निकेतन, खोदादाद सर्कल, दादर येथे दुपारी 12 वाजता मध्यान्ह आरती करून शिर्डी येथे मुक्कामी निघणार आहे. 8000 पदयात्री यात सहभागी होणार आहेत. पदयात्रेच्या नऊ दिवसात पालखी पूजा, जप, आरती, श्री साईसच्चरित पाच पोथ्यांचे सामूहिक पारायण, भंडारा असा दिनक्रम असणार आहे. या सोहळ्यात साई भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे विश्वस्त किशोर परब यांनी केले आहे.


























































