सीमा भागात आजपासून मराठी सन्मान यात्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रविवारी (दि. 15) राजहंस गडावरून मराठी सन्मान यात्रा काढण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात होणारी मराठी सन्मान यात्रा काही कारणामुळे स्थगित करण्यात आली होती. मराठी भाषकांना न्याय मिळावा यासाठी ही सन्मान यात्रा निघणार आहे.

किल्ले राजहंसगडावरून रविवारी दुपारी तीन वाजता मराठी सन्मान यात्रा सुरू होईल. धामणेमार्गे यात्रा निघणार आहे. त्यानंतर सीमा भागातील गावागावात सन्मान यात्रा पोहोचणार आहे. सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी व सीमा भागातील मराठी भाषेचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे ही सन्मान यात्रा निघणार आहे. या सन्मान यात्रेच्या माध्यमातून सीमा भागातील मराठी भाषकांना एकवटून सीमा प्रश्नाची सोडवणूक व्हावी यासाठी मराठी सन्मान यात्रेमध्ये मराठी भाषिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन युवा नेते शुभम शेळके यांनी केले आहे.