Iran Israel War – दुबई आणि कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ले, तेल विहिरींना लक्ष्य केल्याने आखातात खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाने 16 व्या दिवशी अत्यंत भीषण वळण घेतले आहे. इराणने संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि कुवेतच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले चढवत युद्धाची व्याप्ती वाढवली आहे. आज इराणने दुबईतील प्रसिद्ध मरीना आणि अल सिफौल परिसरात शक्तिशाली स्फोट घडवून आणले. या हल्ल्यानंतर आखाती देशांमधील महत्त्वाच्या फुजैराह तेल टर्मिनलवरील कामकाज पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

फुजैराह टर्मिनलमध्ये झालेल्या मोठ्या स्फोटामुळे आकाशात काळ्या धुराचे लोट कित्येक किलोमीटरवरून दिसत होते. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला तासन्तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या घटनेत जॉर्डनचा एक नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे. इराणने केवळ दुबईच नव्हे, तर कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळालाही लक्ष केले आहे. सुदैवाने, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.