
शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा केलेल्या दादरच्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयासाठी रविवारी मतदान झाले. ग्रंथसंग्रहालयाच्या मध्यवर्ती, नायगाव आणि कांदिवली-आकुर्ली अशा तीन शाखांच्या 12 जागांसाठी निवडणूक पार पडली. आता 3 एप्रिल रोजी कार्यकारिणी निवड होणार आहे.
मध्यवर्ती कार्यालयातून संजीव भागवत, राजेंद्र कोरडे आणि दिनेश राणे निवडून आले. नायगाव शाखेतून सुरेंद्र करंबे, संदेश कदम, मकरंद केसरकर, अमेय काsंडविलकर, रवींद्र गावडे, जयवंत गोलतकर, सुरेखा भोसले, नेहा राणे विजयी झाले. कांदिवली-आकुर्ली शाखेतून प्रदीप झोरे निवडून आले.
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या एकूण 40 जागांसाठी निवडणूक झाली. त्यातील 28 जण याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. येत्या 3 एप्रिल रोजी कार्यकारिणीची निवड होणार आहे. निवडून आलेल्या 40 सदस्यांमधून कार्यकारिणी निवडली जाईल. कार्याध्यक्ष, मुख्य कार्यवाह, इतर कार्यवाह, खजिनदार आदी पदांची निवडणूक होईल, अशी माहिती निवडणूक अधिकारी किरण सोनवणे यांनी दिली.
‘मसाप’ निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडीचे तिघे विजयी
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 2026 ते 2031 साठीच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रमुख तीन पदावर साहित्य संवर्धन आघाडीचे उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारामध्ये योगेश सोमण, स्वाती महाळंक आणि प्रदीप निफाडकर हे विजयी झाले. या निवडणुकीत एकूण मतदान 10901इतके झाले, त्यापैकी वैध मतदान 10713 इतके, तर अवैध मतदान 188 इतके झाले.



























































