ओडिशात सरकारी रुग्णालयाला भीषण आग, दहा जणांचा होरपळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओडिशातील कटक शहरात असलेल्या एससीबी सरकारी रुग्णालयाला भीषण आग लागली असून या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही आग रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागली आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्राथमिक तपासात सांगितले जात आहे. या दुर्घटनेत आणखी 11 जण जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरूआहेत.

बातमी अपडेट होत आहे.