
देशाची अर्थव्यवस्था आणि अन्नप्रणालीत 1.5 अब्जांपेक्षा जास्त शेतातील प्राणी गुंतलेले आहेत. मात्र आर्थिक निर्णय, धोरणात्मक चौकट आणि विकासाच्या मोजमापांमध्ये ते अद्यापही अदृश्यच राहिले आहेत. त्यांना सहन करावा लागणाऱ्या क्रौर्याचा सामना करण्यासाठी ‘इंडिया करुणा कोलॅबोरेटिव्ह’ (आयकेसी) या देशातील पहिल्या प्रकारच्या राष्ट्रीय मंचाचे नुकतेच मुंबईत उद्घाटन करण्यात आले. व्यवसाय, विज्ञान, सार्वजनिक आरोग्य आणि नागरी समाज अशा विविध क्षेत्रांतील 50 पेक्षा जास्त संस्था आणि 70 पेक्षा जास्त नेते आयकेसीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत.



























































