‘लंबी जुदाई’ फेम अभिनेत्री मधु मल्होत्रा यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनय आणि सौदर्याने 80 आणि 90चे दशक गाजवणाऱया ज्येष्ठ अभिनेत्री मधु मल्होत्रा (72) यांचे मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाचे नेकमे कारण समोर आले नाही. बॉलीवूडमधून त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करण्यात येत आहे.

मधु मल्होत्रा या 1983मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हीरो’ या सुपरहिट चित्रपटातील ‘लंबी जुदाई’ या गाण्यामुळे लोकप्रिय झाल्या होत्या. दिग्दर्शक सुभाष घई यांनी त्यांना संधी दिली होती. त्या एक विनम्र महिला होत्या, अशा शब्दांमध्ये सुभाष घई यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘अंधेरा’ या भयपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. ‘द ग्रेट गॅम्बलर’, ‘कर्ज’, ‘विधाता’ इत्यादी चित्रपटांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची होती. ‘वो बेवफा थी’ हा वर्ष 2000मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा शेवटचा चित्रपट होता.