Himachal Pradesh – मनालीमध्ये जोरदार बर्फवृष्टी, अटल बोगद्यात 1000हून अधिक वाहने अडकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली. रस्त्यांवर सर्वत्र बर्फ साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून अटल बोगद्यात 1000हून अधिक वाहने अडकली होती. अडकेलल्या वाहनांची माहिती मिळताच मनाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर अडकलेली वाहने मनालीकडे वळवण्यात येत आहेत.

शनिवारी दुपारी मनालीला लागून असलेल्या विविध भागात अचानक बर्फवृष्टी सुरू झाली. बर्फवृष्टीमुळे पर्यटकांची वाहने बर्फावरून घसरली. विविध ठिकाणी मनाली पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. अचानक झालेल्या मुसळधार बर्फवृष्टीमुळे अटल बोगद्याच्या दक्षिण पोर्टलजवळ एक हजाराहून अधिक वाहने बर्फात अडकल्याचे मनालीचे डीएसपी केडी शर्मा यांनी सांगितले.

घटनास्थळी मनाली पोलीस आणि बचाव पथके तैनात असून बचाव कार्य सुरू आहे. सर्व पर्यटकांना मनालीमध्ये सुरक्षित हलवण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. तसेच रस्त्यावरील बर्फ हटवण्याचे कामही सुरू आहे.