Tv इंडस्ट्रीत अभिनय नाही तर ‘कुंडली’ पाहून काम मिळतं; अभिनेत्री फलक नाझचा निर्मात्यावर खळबळजनक आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनोरंजन विश्वात कास्टिंगच्या पद्धतीवरून नेहमीच काहीना काही वाद झाल्याचे आपण ऐकले असेल. एखाद्या कलाकाराची मनोरंजन विश्वात निवड होण्यासाठी त्याच्या अभिनय पाहिला जातो, हे सर्वांनाच माहित आहे. मात्र आता एका अभिनेत्रीने केलेल्या दाव्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. ‘बिग बॉस ओटीटी 2’ फेम अभिनेत्री फलक नाझ हिने टीव्ही इंडस्ट्रीतील कास्टिंग प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. फलकच्या मते, सध्या इंडस्ट्रीत कलाकारांचे टैलेंट किंवा अभिनय कौशल्य नाही, तर चक्क त्यांची जन्मकुंडली पाहून त्याला काम दिले जात असल्याचा दावा तिने केला आहे.

फलक नाजने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत एका हिट निर्मात्यावर निशाणा साधला आहे. तिने म्हटले की, “पूर्वी कलाकारांना त्यांच्या कामाच्या जोरावर भूमिका मिळायच्या, पण आता काळ बदलला आहे. आता तुमचे इंस्टाग्राम फॉलोअर्स आणि तुमची जन्मकुंडली पाहून तुम्हाला काम दिले जाते. इंडस्ट्रीतील एक अतिशय हिट निर्माते आहेत, ज्यांच्याकडे ही नवी पद्धत सुरू आहे.” फलकनने या निर्मात्याचे नाव थेट घेतले नसले तरी, सोशल मीडियावरील अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Falaq Naazz (@falaqnaazz)

आपला अनुभव सांगताना फलक पुढे म्हणाली की, “नुकताच मला एका प्रोडक्शन हाऊसचा फोन आला होता. त्यांनी मला एका चॅनलवरील शो आणि त्यातील पात्राबद्दल माहिती दिली. साधारणपणे अशा वेळी कलाकारांना लुक टेस्ट किंवा ऑडिशनसाठी बोलावले जाते, पण त्यांनी मला माझी जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थान विचारले. सुरुवातीला मी माहिती दिली, पण नंतर विचार केल्यावर मला या गोष्टीचा प्रचंड राग आल्याचे फलकने सांगितले. खरं तर कुंडली जुळवून लग्न होत नाही आणि तुम्ही शो कसा चालवणार असा सवाल तिने यावेळी उपस्थित केला.

फलकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सच्या मते, एकता कपूर सध्या कुंडलीच्या आधारावर कलाकारांची निवड करत आहेत, तर काहींनी नुकत्याच कास्ट झालेल्या काही कलाकारांच्या अभिनय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत फलकच्या दाव्याला दुजोरा दिला आहे.