
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चळवळीतील मराठी भाषिकांच्या आवाज मध्यवर्ती तसेच शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिपक अर्जूनराव दळवी यांचे आज निधन झाले.मराठी भाषिक चळवळीचे केंद्र असलेल्या बेळगांव येथे टिळकवाडितील रहात्या घरी वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एकीकरण समीतीची अपरिमित हानी झाली असून सीमाभाग दुखःसागरात बुडाला आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,सुना,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.अंत्यविधि शहापूर स्मशानभूमीत संध्याकाळी 7.30 वाजता होणार असल्याचे, मध्यवर्ती महाराष्ट्र इकरण समितीकडून सांगण्यात आले.



























































