
केंद्रातील मोदी सरकार देशातील नोकरदारांना जोरदार झटका देण्याच्या तयारीत आहे. नोकरदारांना पगारासोबत मिळणाऱया सुविधांवर सरकार टॅक्स लावणार आहे. हा नवीन नियम 1 एप्रिलपासून लागू केला जाणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डने (सीबीडीटी) इन्कम टॅक्स नियम 2026 संबंधी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या नियमाचा उद्देश म्हणजे पंपनीकडून मिळणारी सुविधांची किंमत ठरवणे अधिक सोपे होणार आहे. या नव्या नियमामुळे पगार म्हणजे केवळ खात्यात आलेला पैसा नव्हे तर पंपनीकडून मिळणारी सुविधाही जोडली जाईल. ज्या शहरांची लोकसंख्या 40 लाखांहून अधिक आहे. तेथील घराच्या सुविधेची किंमत कर्मचाऱयांच्या पगाराच्या 10 टक्के मानली जाईल. 15 लाख ते 40 लाखांच्या लोकसंख्येच्या शहरात हा दर 7.5 टक्के असेल, तर अन्य छोटय़ा शहरातील दर 5 टक्के असेल. जर पंपनीकडून कर्मचाऱयाला घर भाडय़ाने दिले आहे. त्यावर 10 टक्के टॅक्स लावला जाईल. जर घर फर्निचरसोबत मिळत असेल तर फर्निचरच्या किमतीवर 10 टक्के अतिरिक्त जोडले जाईल. छोटय़ा कारची व्हॅल्यू 5 हजार रुपये प्रतिमहिना मानली जाईल. ड्रायव्हर मिळाला असेल तर 3 हजार रुपये अतिरिक्त जोडले जाईल. मोठय़ा कारची व्हॅल्यू 7 हजार रुपये प्रतिमहिना ड्रायव्हरसाठी 3 हजार अतरिक्त असेल.
हिंदुस्थानात नवीन ऑडी एसक्यू-8 लाँच
जर्मन लक्झरी कार उत्पादक पंपनीने हिंदुस्थानात नवीन ऑडी एसक्यू-8 लाँच केली आहे. या कारची किंमत 1 कोटी 77 लाख 73 हजार (एक्स शोरूम) आहे. ही कार 10 वर्षांचे कॉम्प्लीमेण्टरी रोडसाईड असिस्टंटस तसेच आकर्षक सर्वसमावेशक देखभाल व सर्व्हीस पॅकेजेससह येते. या एसयूव्हीमध्ये 4.0-लिटर व्ही-8 टीएफएसआय इंजिन असून ते 373 केडब्ल्यू शक्ती आणि 770 एनएम टॉर्क निर्माण करते, ज्यामुळे ही कार केवळ 4.1 सेपंदांत 0 ते 100 किमी/तास वेग गाठते.
महाराजाची पानडी आणि हिना अगरबत्ती बाजारात
महाराजा अगरबत्तीची पानडी आणि हिना प्युअर ब्रँडची अगरबत्ती बाजारात आली आहे. ही अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. तसेच केसरिया उद, केसरिया चंदन, मिस्टिक रोझस टॅपल ब्लिस, रॉयल उद, हिना, पानडी, सुखद सँडल, पल्सर, बेला, कॉन्फिडंट, ड्रीम, लव्हेंडर, सँडलवूड, स्वामी, ग्रीन मस्क, कशमिरी लव्हेंडर, अंगारे उद, कस्तुरी आणि अनमोल अशा प्रकारातील उत्तम सुगंधी अगरबत्त्या, रघुनाथ निवास, डी.व्ही. देशपांडे मार्ग, शिवाजी पार्क रोड क्रमांक 4, दादर येथे उपलब्ध आहे. संपर्क ः 8369185071.
सब शुभ होगा मोहीम
म्हैसूर दीप परफ्युमरी हाऊसच्या एमडीपीएच झेड ब्लॅकच्या शुद्ध कापूर आणि भीमसेनी कापूरच्या सब शुभ होगा या मोहिमेत एमएस धोनी आशेचा नवसंदेश देणार आहे. या फ्लॅगशीप ब्रँडतर्फे दूरचित्रवाणी जाहिरात सादर केली.
लॉरिट्झ नुडसेन
‘लॉरिट्झ नुडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन’ने, विद्याविहार येथील सोमैया विद्यापीठाच्या ‘के. जे. सोमैया स्कूल ऑफ इंजिनिअरिंग’ने ‘फॉर्म्युला स्टुडंट’ टीम, ‘ओरियन रेसिंग इंडिया’शी भागीदारी केली आहे.
इंजेक्शनसाठी करार
झायडस आणि ल्युपिन यांच्यात इनोव्हेटिव्ह सेमाग्लुटाइड इंजेक्शनच्या सह-विक्रीसाठी करार करण्यात आला. यावेळी झायडस लाइफसायन्सेसचे एमडी
डॉ. शार्विल पटेल आणि ल्युपिनचे मॅनेजिंग डायरेक्टर निलेश गुप्ता उपस्थित होते.
‘कन्सर्व कॉन्क्लेव्ह’
एसबीआय फाउंडेशनने ‘कन्सर्व कॉन्क्लेव्ह 2026’चे आयोजन केले. यामध्ये शहरी पर्यावरणीय लवचिकता मजबूत करण्यासाठी व्यावहारिक मार्गांवर विचारविनिमय करण्याकरिता उद्योग, सरकार, नागरी समाज आणि हवामान तज्ञांना एकत्र आणण्यात आले.
अॅरोकेम रतलामचा अल्कोहॉल फ्री डिओ
अॅरोकेम रतलाम प्रा.लि.ने सेवेन सिज अल्कोहोल फ्री डिओ नवीन पॅकमध्ये बाजारात आणले आहे. या डिओचा सुगंध अत्यंत उत्तेजक, दर्जेदार आणि टवटवीत करणारा आहे. या डिओच्या 200 मिलीची किंमत 200 रुपये आहे. फॅशन, एचटूओ, ब्लू स्टार, ब्लॅक ऊथ, अॅरो मॅग्नेट हे इतर प्रकारचे उपलब्ध असलेले अल्कोहोल फ्री डिओ बाजारात उपलब्ध आहेत. संपर्क ः 07412-236226.
सॅमसंग गॅलेक्सी ए-57 आणि ए-37 येतोय
सॅमसंग पंपनी पुढील आठवडय़ात नवीन स्मार्टपह्न गॅलेक्सी ए-57 5-जी आणि गॅलेक्सी ए-37 5-जी लाँच करणार आहे. या दोन्ही पह्नमध्ये धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी आयपी-68 दिला जाण्याची शक्यता आहे. पह्नमध्ये अपग्रेडेड प्रोसेसर्स, वाय-फाय 6ई आणि ब्ल्यूटूथ 6 असण्याची शक्यता आहे. या पह्नची किंमत लाँचिंगनंतर स्पष्ट होईल.
करिष्माची नवी अगरबत्ती बाजारात
बंगळुरू येथील करिष्मा प्रोडक्ट्सने प्युअर ब्रँडची नवी अगरबत्ती हरी पानडी आणि विरा मसाला अगरबत्ती बाजारात आणली आहे. या अगरबत्त्या नैसर्गिक वनस्पतीपासून तयार केल्या आहेत. तसेच या अगरबत्तीला नैसर्गिक सुगंध आहे. अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. संपर्क – 9343834805.



























































