
यंदा बाजारपेठेत अतिशय किरकोळ प्रमाणात हापूस आंबा दाखल झाला आहे. हापूस आंब्याची अडीच ते तीन हजार रूपये डझन दराने विक्री होत आहे. यंदा बिटकीलाही भाव आला असून बिटकी पाचशे रुपये डझन दराने विकली जात आहे. यावर्षी वांझ मोहरामुळे अपेक्षित फळधारणा झाली नाही. उन्हामुळे मोहर करपून गेला आणि आंबा उत्पादन घटले. त्यामुळे किरकोळ प्रमाणात हापूस आंबा बाजारात दाखल झाला आहे. अडीच हजार ते तीन हजार रूपये दराने डझनभर आंब्याचा दर पाहून अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. बिटकी तब्बल पाचशे रुपये दराने विकली जात आहे. पायरी आंबाही दोन ते अडीच हजार रुपये दराने विकला जात आहे. सर्वसामान्य ग्राहकांना एप्रिलच्या पंधरवडय़ापर्यंत खिशाला परवडणाऱया आंब्याची वाट पाहावी लागणार आहे.


























































