
लंडनमधील ब्रेंट परिसरातील सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकल्याने हिंदुस्थानी वंशाच्या दोन व्यक्तींना 1391 पाऊंड म्हणजेच जवळपास पावणेदोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अक्षीतकुमार भद्रे पटेल आणि हितेश पटेल अशी या दोन व्यक्तींची नावे आहेत. या व्यक्तींना थुंकल्याप्रकरणी 100 पाऊंड दंड भरण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी दंड न भरल्याने हे प्रकरण कोर्टात पोहोचले. कोर्टाने थेट 1391 रुपये दंड ठोठावला आहे. काwन्सिलला दरवर्षी सुमारे 30,000 पाऊंड म्हणजेच जवळपास 30 लाख रुपये फक्त पानाचे डाग साफ करण्यासाठी खर्च करावे लागतात.

























































