
एकच जिद्द…वाढवण बंदर रद्द अशा घोषणा देत या विनाशकारी प्रकल्पाच्या विरोधात मच्छीमार, शेतकरी, बागायतदार, आदिवासी बांधव उद्या, सोमवारी सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या दरम्यान भव्य मोर्चा काढणार आहेत.
वाढवण बंदर प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा, जिंदाल बंदर आणि विनाशकारी टेक्स्टाईल पार्क रद्द करा, पर्यावरणास घातक चौथी मुंबई रद्द करा, मुंबईतील कोळीवाडय़ांचे व बाजारांचे पुनर्विकास धोरण मच्छीमारांच्या हिताचे करा, शेतकऱयांप्रमाणे मच्छीमारांची थकीत कर्जे माफ करा अशा मागण्या आंदोलनकर्त्यांच्या आहेत. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, नॅशनल फिशवर्कर्स पह्रम, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार संघ, मुरबे बंदर विरोधी संघर्ष समिती अशा अनेक संघटना या मोर्चात सहभागी होणार आहेत.
नवतरुण मित्र मंडळ सूर्यानगर येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. शाखाप्रमुख नीलेश पोहकर, नगरसेवक विश्वास शिंदे, उत्तम कुऱहाडे, निखिल गजरे, धर्मानाजी पंत आणि नव तरुणचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

























































