
मुंबईच्या माजी उपमहापौर आणि भाजपच्या वॉर्ड क्रमांक 98 च्या विद्यमान नगरसेविका अलका केरकर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये त्या तिसऱयांदा निवडून आल्या होत्या.
निवृत्त शिक्षिका असणाऱया अलका केरकर यांचा या प्रभागात दांडगा जनसंपर्क होता. सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणाऱया नगरसेविका अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने वांद्रे पश्चिम विभागाचे कधीच न भरून निघणारे नुकसान झाले आहे, अशी हळहळ व्यक्त होत आहे.

























































