नाशिकमध्ये आणखी एक ‘खरात’ वावरतोय, नाना पटोले यांच्या दाव्याने खळबळ; मुख्यमंत्र्यांना पेनड्राईव्ह देऊनही कारवाई नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधिमंडळाच्या मागील अधिवेशनात विधानसभेमध्ये आपण एक पेनड्राईव्ह देऊन नाशिकचेच प्रकरण समोर आणले होते. चौकशी करण्याची मागणी केली होती, पण तो पेनड्राईव्ह मुख्यमंत्र्यांनी लपवून ठेवला. नाहीतर प्रकरण त्याचवेळी उघडकीस आले असते, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज केला. एक खरात सापडला, पण नाशिकमध्ये आणखी एक ‘खरात’ वावरतोय, त्याचीच माहिती त्या पेनड्राईव्हमध्ये होती, असे पटोले म्हणाले.

नाशिकमध्ये आणखी एक असेच प्रकरण आहे ज्यामध्ये मंत्रालयातील काही अधिकारी आणि मंत्रीसुद्धा सहभागी आहेत, असे ते म्हणाले. पवित्र महापुंभ जिथे होत आहे त्या नाशिकमध्ये अशा घटना घडत असल्याने महाराष्ट्र बदनाम होत आहे असे ते म्हणाले.

विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणणार

अशोक खरातप्रकरणी विधानसभेत उद्या स्थगन प्रस्ताव आणणार आहोत. खरातसोबत पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्यातील अनेक मंत्र्यांचे पह्टो, व्हिडीओ समोर आले असून त्यांच्यावरही कारवाई होणार का, असा सवाल पटोले यांनी केला. खरात प्रकरणात मागणीही झाली नसताना तीनच दिवसांत एसआयटी स्थापन करण्यात आली, त्याबाबतही सरकारला विचारणा करू असे ते म्हणाले.