
ब्रिटिश एअरवेजच्या हाँगकाँगहून लंडनला निघालेल्या विमानात तासाभरातच एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला. क्रू मेंबर्सनी विमान न वळवता किंवा विमानाचे तातडीचे लँडिंग न करता प्रवास सुरु ठेवला. त्यामुळे विमानातील प्रवाशांना 13 तास मृतदेहासह प्रवास करावा लागला. सुरुवातीला स्वच्छतागृहात मृतदेह ठेवण्याचा उपाय सुचवला. मात्र प्रवाशांनी त्याला विरोध केला. कर्मचाऱयांनी महिलेचा मृतदेह अशा ठिकाणी ठेवला (रिअल गॅलरीत) जिथे तापमान जास्त होते. त्यामुळे काही वेळातच विमानात दुर्गंधी पसरली. प्रवाशांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागला.
n यावर ब्रिटिश एअरवेजच्या प्रवक्त्याने दिलगिरी व्यक्त करत म्हटले की, आमच्या विमानात एका प्रवाशाचा मृत्यू झाला ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. अशा परिस्थितीत आम्ही प्रोटोकॉलनुसार काम करतो. प्रवाशांच्या सोयीसाठी कर्मचाऱयांनी शक्य तेवढे प्रयत्न केले. ज्या महिलेचा मृत्यू झाला ती 60 वर्षांची होती.
n वैमानिकाने महिला प्रवाशाचा मृत्यू झाल्यानंतर लंडनला ते विमान लँड झाल्यानंतर पोलिसांनी येऊन विमानाची पाहणी केली. त्या वेळी पाहणी पूर्ण होईपर्यंत म्हणजे सुमारे 40 मिनिटे प्रवाशांना विमानातच बसावे लागले.
























































