
इराण विरुद्ध सुरू असलेले युद्ध पाच दिवसांसाठी थांबवण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केली. इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर व इंधन साठय़ांवर पुढचे पाच दिवस कसलेही हल्ले केले जाणार नाहीत,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
तब्बल 23 दिवसांपासून इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तुफान हवाई हल्ले सुरू आहेत. मात्र, युद्धातून काहीही निष्पन्न झालेले नाही. नेतृत्वाची एक फळी गारद झाल्यानंतरही इराण निकराने झुंज देत आहे. तेल व गॅसचा शस्त्रासारखा वापर करून इराणने अमेरिकेसह जगाच्या तोंडाला फेस आणला आहे. त्यामुळे अमेरिका व इस्रायलवर जगभरातून दबाव वाढला आहे. त्यामुळे गोंधळलेल्या ट्रम्प यांनी आज अचानक एकतर्फी युद्धविश्रांतीची घोषणा केली.

























































