
रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्यातील अवैध खाणींमुळे सरकारचा कोटय़वधी रुपयांचा महसूल बुडतो. अवैध खाणींना मदत करणारे तहसीलदार, प्रांत यांना अद्दल घडवा. या अधिकाऱ्यांचा उन्मत्तपणा मोडून काढा, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केली. त्यावर या भागातील खाणींमधून मागील पाच वर्षांत झालेल्या अवैध उत्खननाची चौकशी केली जाईल. गरज पडल्यास एसआयटी लावण्याची महत्त्वाची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.
रायगड, पालघर व ठाणे जिल्ह्यात क्रशर स्टोनद्वारे खनिज काढले जाते. पर्यावरणाची परवानगी न घेता मोठय़ा प्रमाणावर उत्खनन होते. तक्रारीनंतर ताप्तुरती कारवाई होते. पुन्हा उत्खनन सुरू होते. सरकारचा प्रचंड मोठा महसूल बुडतो. यामध्ये मदत करणारे तहसीलदार, प्रांत अशा अधिकाऱयांना अद्दल घडवून करवाई करा, अशी मागणी प्रभू यांनी केली.
























































