
बीडच्या परळी मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकेतून सेवानिवृत्त झालेल्या सूर्यकांत मुंडे यांना सायबर भामट्याने 23 लाख 42 हजार रुपयांना फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सूर्यकांत मुंडे यांना 5 मार्च रोजी एका व्यक्तीने फोन करत तुमच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे असे सांगत रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या नावाने नोटीस पाठवली तसेच स्वतः सीबीआय पोलीस असल्याचे भासवले यासाठी त्या व्यक्तीने मुंडे यांना व्हिडिओ कॉल देखील केला होता.
यानंतर त्याने वेगवेगळे कारणे सांगत काही खाते क्रमांक देत त्यावर रक्कम भरायला भाग पाडले.यानुसार दिनांक 5 ते 18 मार्चपर्यंत मुंडे यांनी तब्बल 23 लाख 42 हजार रुपये या खात्यावर भरले.यानंतर देखील त्यांना पैशाची मागणी होत असल्याने मुंडे यांनी ही बाब कुटुंबीयांना सांगितल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. आता या प्रकरणात बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.






























































