शेअर बाजार वधारला, गुंतवणूकदारांना दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे 1 एप्रिलला शेअर बाजार वधारला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1186 अंकांनी वधारून 73,134 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 348 अंकांनी वाढून 22,679 अंकांवर बंद झाला. इस्रायल-इराण तणाव कमी होण्याच्या अपेक्षेमुळे बाजार वधारल्याचे सांगितले जात आहे. निफ्टी मिडकॅपमध्ये 2.2 टक्के आणि स्मॉलकॅपमध्ये 3.4 टक्के वाढ झाली. निफ्टीतील शेअर्समध्ये इंटरग्लोब एविएशन, अदानी पोर्टस्, अदानी एंटरप्राइजेस, ट्रेंट आणि भारत इलेक्ट्रॉनिक्सचा समावश आहे. तर डॉ. रेड्डीज लॅब, एचडीएफसी लाइफ, सिपला, एनटीपीसी आणि सन फार्मा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.