
n उन्हाळ्यात टाचांना भेगा पडू नये म्हणून घरच्या घरी उपाय करता येतील. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने पाय धुवा. त्यानंतर टाचांना नारळाचे तेल लावा आणि मसाज करा. नंतर कॉटनचे मोजे घाला आणि रात्रभर तसेच राहू द्या.
n टबमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात 2-3 चमचे मध मिसळा. त्यात पाय 15-20 मिनिटे त्यात ठेवा. हलक्या हातांनी स्क्रब करा, पाय पुसून घ्या आणि क्रीम लावा. अन्य उपायांत कोरफड आणि ग्लिसरीनचा वापर करता येईल.

























































