घाटकोपरमध्ये आठ रिक्षा जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घाटकोपरच्या छेडानगर परिसरातील पुलाखाली पार्क केलेल्या आठ रिक्षांना आज सकाळी अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, आठही रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. या आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. रिक्षांमध्ये सीएनजीचे बाटले असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दोन अग्निशमन बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.